प्रसिद्ध अभिनेता सोनु सुद यांनी माध्यान्ह आरतीकरीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.