प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी मदिर विभाग पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.