राज्यस्तरीय मंदिर प्रीमियर लीगमध्ये यशस्वी ठरलेल्या खेळाडूंचा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार
शिर्डी
दि. १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीच्या क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली व चतुर्थ क्रमांक पटकावला. तसेच महाराष्ट्रातील सर्व देवस्थानांच्या संघांमध्ये “सर्वांत शिस्तबद्ध संघ” हा मानाचा पुरस्कार (चषक व रु. ५,५५५/- रोख पारितोषिक) संस्थानच्या संघाला प्राप्त झाला.
या उल्लेखनीय यशाबद्दल आज संस्थानचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
कर्णधार श्री. सुदेश रामदास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघातील पुढील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली — गणेश रूपचंद जानराव, अतिक दिलदार पठाण, आकाश भानुदास नराडे, अनिल शंकर जगताप, संतोष बाबासाहेब गावडे, बाबासाहेब लहाणु दरके, चंद्रकांत दिलीप जपे, अंबादास नवीन शेजवळ, किरण भगवान मोरे, प्रमोद भानुदास बहे, सुदर्शन अशोक वेर्णेकर, दुश्यंत छत्रराव आहेर व श्याम माधव वायकर.
संघाला मार्गदर्शन क्रीडाशिक्षक श्री. राजेंद्र कोहोकडे सर व डॉ. विक्रम सातपुते सर यांनी केले. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे साहेब व प्रशासकीय अधिकारी श्री. अतुल वाघ साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देत संस्थानच्या सेवकांनी क्रीडा क्षेत्रातही आदर्श निर्माण केल्याबद्दल कौतुक केले. ही कामगिरी केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून शिस्त, संघटन आणि संस्थानप्रती निष्ठेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.



