Languages

  Download App

News

News

शिर्डी -
           श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०६ वा श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्‍या फोटो व पोथीच्‍या मिरवणूकीने सुरुवात झाली असून मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व “श्रीसाई बालाजी” हा भव्‍य देखावा व अमेरीका येथील दानशुर साईभक्‍त‍ श्रीमती प्र‍थीपा सतिष यांच्‍या देणगीतून  मंदिर व मंदिर परीसरात करण्‍यात आलेल्‍या आकर्षक फुलांच्‍या सजावटीने साईभक्‍तांचे लक्ष वेधून घेतले.
उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. आरतीनंतर पहाटे ०५.४५ वाजता श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्‍य ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी,  मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विणा घेऊन तर कृषी अधिकारी अनिल भणगे  व  मुख्‍याध्‍यापक कन्‍या विद्या मंदिर व कनिष्‍ठ महाविद्यालय गंगाधर वरघुडे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी तथा प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.  मिरवणूक व्‍दारकामाईत आल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास प्रारंभ झाला. यावेळी संस्‍थानच्‍या तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालीमठ यांनी प्रथम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्दितीय, प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे यांनी तृतीय, प्राचार्या शिल्‍पा पुजारी यांनी चौथ्‍या व प्र. अधिक्षक रामदास कोकणे यांनी पाचव्‍या अध्‍यायाचे वाचन केले.
सकाळी ०७.०० वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबा संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपुजा केली. सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री शंकर गिरी अंबड, जालना यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत श्रीम.अश्विनी सरदेशमुख, मुंबई यांचा ‘साईगीतांजली’  कार्यक्रम,  दुपारी ०४.००  वाजता ह.भ.प. श्री प्रणव जोशी , जालना  यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तर सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती, रात्रौ ०७.०० ते ०९.३० यावेळेत साईद्वारकामाई, बोरीवली, मुंबई यांचा ‘साईराम संगीत संध्‍या’ हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्‍न होणार असुन, रात्रौ ०९.१५ वाजता गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. मिरवणूकीनंतर श्रींची शेजारती होईल. तर अखंड पारायणासाठी श्री व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्‍यात येणार आहे.
 
शनिवार, दिनांक १२ ऑक्‍टोबर हा श्रींचे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम,सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.डॉ.सविता मुळे, छ.संभाजीनगर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्री साईसेवा मंडळ, वर्धा यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम,दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. सौ.माधुरी चंद्रकांत गुंजाळ, संगमनेर यांचा ‘साईभजन संध्‍या’ कार्यक्रम, सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल.  सायं.०७.०० ते ०८.३० वा.श्रीमती पुजा चड्डा, दिल्‍ली द्वारा नाना वीर, शिर्डी यांचा ‘साईभजन संध्‍या’ कार्यक्रम व रात्रौ ०८.३० ते १०.०० यावेळेत श्री.योगेश तपस्‍वी, कर्वे नगर, पुणे यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम होणार  असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्‍या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत श्रींच्‍या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक १२ ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.

Recent News