शिर्डीः-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर दिनांक २६ ऑगस्ट रोजी रात्रौ १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे यांचे श्रीकृष्णजन्म कीर्तन होवुन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर श्रींची शेजारती झाली.
तसेच आज सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाचे स्टेजवर ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे यांचे गोपालकाला किर्तन झाले. कीर्तनानंतर १२.०० वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्य श्री सर्जेराव अशोकराव पा. कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेला श्री गोकुळाष्टमी उत्सव आनंदमय व भक्तीमय वातावरणात पार पडला.