श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. सौ. प्राची व्यास, बोरीवली यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.