Languages

  Download App

News

News

मोफत प्‍लास्‍टीक सर्जरी शिबीराचे उद्घाटन संपन्‍न.
         श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व डॉ.राम चिलगर गीव्‍ह मी फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांचे संयुक्‍त विद्यमाने दि.०६ डिसेंबर २०२४ ते दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईनाथ रुग्‍णालयात (२०० रुम ) येथे प्‍लास्‍टीक सर्जरी शिबीराचे आयोजन करणेत आलेले आहे. सदरील शिबीराचा उद्घाटन समारंभ श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी, संदिप कुमार भोसले यांचे अध्‍यक्षतेखाली आज दि. ०६ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. सदर शिबीराचे वेळी बोलताना प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी  यांनी रुग्‍णालयातील डॉक्‍टर्स , नर्सिग स्‍टाफ व इतर कर्मचारी यांच्‍या सेवाभाव वृत्‍तीमुळे येथे होणारे सर्व शिबीरे यशस्‍वी होवुन त्‍याचा गरीब व गरजु रुग्‍णांना मोठा फायदा होत असुन यातुन श्री साईबाबांच्‍या रुग्‍ण सेवा हिच ईश्‍वरसेवा या शिकवणीचा प्रत्‍यय येथील वातावरणातुन नेहमी येत असलेबाबत सांगीतले.
यावेळी गीव्‍ह मी फाउंडेशन चे डॉ.राम चिलगर, डॉ.सुजित खोडे, डॉ.स्‍वाती पांडे  प्र.वैद्यकीय संचालक, डॉ.प्रितम वडगावे, प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, डॉ.राम नाईक, डॉ.विद्या बो-हाडे, डॉ.रेवन येंगे, डॉ.गोविंद कलाटे, डॉ.मृणाली गोंदकर, डॉ.प्राजक्‍ता बनकर, जनसंपर्क अधिकारी, सुरेश टोलमारे,  प्र.अधिसेविका, नजमा सय्यद यांचे सह रुग्‍ण व रुग्‍णांचे नातेवाईक उपस्‍थीत होते.
शिबीर यशस्‍वी व्‍हावे याकरीता सर्व ओटी/वार्ड इन्‍चार्ज, नर्सिंग स्‍टाफ यासंह कर्मचारी  प्रयत्‍नशील आहेत. कार्यक्रमाचे प्रस्‍तावीक, डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार  सुरेश टोलमारे यांनी मानले.

Recent News