शिर्डी :
श्री साईबाबा संस्थानला जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. संस्थेची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.
श्री साईबाबांच्या कृपेने लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड चे अध्यक्ष डॉ. मनिष कुमार व उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र मित्तल यांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचेकडे प्रदान केले. यावेळी संस्थानचे प्र.उप मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी श्री संदिपकुमार भोसले, प्र.प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज, मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे धार्मिक, सामाजिक व मानवसेवेतील योगदान अधोरेखित झाले आहे. भाविकांच्या सेवेसाठी संस्थान सातत्याने करत असलेल्या कार्याला यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभला आहे.