माननीय महामहीम राज्यपाल श्री एस. अब्दुल नाजीर, आंध्रप्रदेश राज्य यांनी सहकुटुंब धुप आरतीकरीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल, श्री साई मुर्ती व श्री साईसतचरीत्र देवून सत्कार केला.
दर्शनानंतर महामहीम राज्यपाल श्री एस. अब्दुल नाजीर, आंध्रप्रदेश राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबांचे वस्तुसंग्रहालयाला भेट दिली व तेथील श्री साईबाबांनी वापरलेल्या वस्तुंची माहिती घेतली.
Undefined
आंध्र प्रदेश राज्यपालांचे श्री साईबाबाचे दर्शन
Thursday, July 25, 2024 - 20:45