Languages

  Download App

श्री साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी व उपचार शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 1272 रुग्णांना लाभ

श्री साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी व उपचार शिबिरास

श्री साईनाथ  रुग्‍णालयात मोफत त्‍वचा रोग तपासणी व उपचार शिबीरास उत्‍सफुर्त प्रतिसाद

           श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा  चॅरीटेबल ट्रस्‍ट,  म्‍हैसुर यांचे संयुक्‍त विद्यमाने मोफत  त्‍वचारोग तपासणी शिबीर दिनांक दि.२४/१०/२०२४ ते दि.२६/१०/२०२४ या दरम्‍यान श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम)  येथे आयोजीत करण्‍यात आलेले होते. या शिबीरात तीन दिवसात १२७२ रुग्‍ण सहभागी झाले यातील सर्व रुग्‍णांवर मोफत त्‍वचारोग तपासणी होवुन उपचार झालेल्‍या रुग्‍णांना मोफत औषधे वाटप करणेत आली. यामधील १५३ रुग्‍णांवर प्रोसिजर करणेत आल्‍या. यामध्‍ये  Fungal Infection, Acne, Skin Tags, Hair fall Eczema, Melasma या सारख्‍या आजारांवर उपचार करणेत आले. यावर विविध प्रकारच्‍या मेडीकल प्रोसिजर देखील विविध उपकरणे व साहित्‍यांच्‍या सहाय्याने करणेत आल्‍या. यामध्‍ये प्रामुख्‍याने Chemical Pealing, Cautery, PRP treatment, IPL या सारख्‍या प्रोसिर्जचा समावेश आहे . अशा प्रकारचे त्वचारोगावरील  मोफत तपासणी व उपचार शिबिर संस्थान रुग्णालयामध्ये प्रथमच आयोजित झाले असल्यामुळे ह्या शिबीरास रुग्‍णांनी उत्‍सफुर्त असा प्रतिसाद दिला.
          सदर शिबीरात जास्‍तीत जास्‍त रुग्‍णांची  तपासणी व्‍हावी व  उपचार मिळावे याकरीता श्री साईनाथ रुग्‍णालयातील त्‍वचारोग तज्ञ डॉक्‍टर डॉ.दादासाहेब कांबळे, सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा चॅरीटेबल ट्रस्‍ट, म्‍हैसुर येथील त्‍वचारोग तज्ञ डॉ.शिवाणी एस.आर., डॉ.हंमसा सी.एन. यांच्‍या समवेत श्री साईनाथ रुग्‍णालयातील सर्व कर्मचारी  यांनी  परिश्रम घेतले.
           कमी कालावधीत जास्‍तीत जास्‍त  रुग्‍णांची तपासणी व उपचार करुन शिबीर यशस्‍वी केल्‍याबद्दल श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.गोरक्ष गाडीलकर यांनी शिबीराकरीता अहोरात्र काम करणा-या टीमचे अभिनंदन केले. यावेळी  श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ. शैलेश ओक, प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, प्र.वैद्यकीय अधीक्षक डॉ.मैथिली पितांबरे, कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष, प्र.सहा.अधिसेविका नजमा सय्यद, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांच्यासह  श्री साईनाथ  रुग्णालयातील कर्मचारी  उपस्थित होते. शिबीरात आलेल्‍या सर्व लाभार्थी रुग्‍णांनी मोफत तपासणी, उपचार व मोफत औषधे दिलेबद्दल श्री साईबाबा संस्‍थानचे विशेष आभार व्‍यक्‍त केले.

Undefined
श्री साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी व उपचार शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 1272 रुग्णांना लाभ
Monday, October 28, 2024 - 18:30