Languages

  Download App

श्री साईबाबा संस्थान, शिरडी आणि शिर्डी ग्रामस्थांनी जागतिक योग दिवस साजरा करून निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले

श्री साईबाबा संस्थान, शिरडी आणि शिर्डी ग्रामस्थांनी जागतिक योग दिवस

शिर्डी –
आधुनिक जीवनात निरोगी राहण्‍यासाठी योग साधना अत्‍यंत महत्‍वाची असल्‍याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने आयोजीत जागतीक योग दिन कार्यक्रमात श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.  
     श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने व्‍दारावती भक्‍तनिवास समोरील बागेत २१ जुन जागतिक योग दिन म्‍हणुन साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमास संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,  उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्र.उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई व  संजय जोरी,शैक्षणिक संकुलांचे प्राचार्य,  मुख्‍याध्‍यापक,  अध्‍यापक,  विद्यार्थी,  संस्‍थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. योगाचार्य डॉ.तुषार शिसोदीया व डॉ नचिकेत वर्पे यांनी सर्वांना योग साधनेचे मार्गदर्शन करुन योगासने करुन घेतले.यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचेसह संस्‍थान अधिकारी, कर्मचारी शिर्डी ग्रामस्‍थ व विद्यार्थी यांनी सार्वजनिकरित्‍या योगासने केली.

Undefined
श्री साईबाबा संस्थान, शिरडी आणि शिर्डी ग्रामस्थांनी जागतिक योग दिवस साजरा करून निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले
Friday, June 21, 2024 - 14:45