Languages

  Download App

साईबाबांच्या चरणी सोनेरी पंचारती!

साईबाबांच्या चरणी सोनेरी पंचारती!

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक ०५ ऑक्‍टोबर २०२४ रोजी मुंबई, महाराष्‍ट्र येथील एका साईभक्ताने साईचरणी १ किलो ४३४ ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सोन्‍याची पंचारती अर्पण केली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या पंचारतीची किंमत जवळपास सुमारे १ कोटी रुपये असून ही सुंदर नक्षिकाम असलेली समई साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आली. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्‍कार केला. 
तसेच, मागील आठवड्यात हैद्राबाद येथील एका साईभक्ताने साईचरणी १ कोटी ८ लाख रुपये किमतीचा डिमांड ड्राफ्ट प्राप्‍त झाला आहे.

Undefined
साईबाबांच्या चरणी सोनेरी पंचारती!
Saturday, October 5, 2024 - 20:15