Languages

  Download App

साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा भव्य समारोह

साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा भव्य समारोह

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली.

आज उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०५.५० वाजता श्रींचे मंगल स्नान व त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०७.०० वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर  व सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.श्री कैलास खरे, रत्नागिरी यांचे काल्याचे कीर्तन झाले. काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त बायजाबाई कोते व तात्या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्य श्री राजेंद्र सुभाष कोते यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. तर दुपारी ०१.०० ते ०३.०० श्री उदय दुग्गल, पुणे यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. श्रीम.ललिता पांडे, जोगेश्वरी यांचा ‘साई स्वराधना’ कार्यक्रम झाला.  तसेच सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती,  सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत सक्सेना बंधु, दिल्ली यांचा ‘साईभजन संध्या’ हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न होईल.  रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.

          श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा) उत्सवाच्या मुहुर्तावर श्री साईबाबा संस्थान प्रकाशित श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,  यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा श्री साई सभागृह येथे संपन्न झाला.

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साईभक्तांनी भरभरुन दान दिले. यामध्ये गहु, तांदुळ ज्वारी व बाजरी असे सुमारे ११५ पोते धान्यरुपाने आणि गुळ, साखर व गहु आटा आदींव्दारे ०३ लाख ६५ हजार ५३० रुपये व रोख स्वरुपात रुपये ६१ हजार ५०१ रुपये अशी एकूण ०४ लाख २७ हजार ३१ रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्दारे प्राप्त झाली. 

हा उत्सव यशस्वरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्के),  तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, भा.प्र.से. व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे प्र.उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदिपकुमार भोसले, सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Undefined
शिर्डीत सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून साईबाबा पुण्यतिथी साजरी
Sunday, October 13, 2024 - 17:15