Languages

  Download App

साईबाबा पुण्यतिथी उत्सव: बायजाबाई कोते यांच्या वंशजांनी फोडली दहीहंडी

साईबाबा पुण्यतिथी उत्सव: बायजाबाई कोते यांच्या वंशजांनी फोडली दहीहंडी

श्री साईबाबा पुण्‍यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त बायजाबाई कोते व तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री राजेंद्र सुभाष कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Undefined
साईबाबा पुण्यतिथी उत्सव: बायजाबाई कोते यांच्या वंशजांनी फोडली दहीहंडी
Sunday, October 13, 2024 - 15:15