Languages

  Download App

News

News

कारगिलज्योतीसह कॅप्टन भंडारी व त्यांचे सहकार्यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल.
कारगिल विजय दिवस, 1999 च्या पाकिस्तानसोबतच्या संघर्षात भारताच्या विजयाचे प्रतीक म्हणून दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. तीव्र आणि प्रदीर्घ युद्धात भारतीय सैनिकांनी केलेल्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान हा दिवस आहे. हा दिवस साजरा करणेपुर्वी दरवर्षी जुलै महिन्‍यात कॅप्‍टन भंडारी व त्‍यांचे सहकारी कारगिल  विजय कलश घेवून शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात भेट देत असतात. याही वर्षी आज सोमवार दि.२२ जुलै २०२४ रोजी कॅप्‍टन भंडारी व त्‍यांचे सहकारी हे कारगिल विजय कलश घेवून शिर्डी येथे श्री साईबाबांचे समाधी मंदिरात दर्शन घेणेसाठी आले होते. त्‍यावेळी संस्‍थानच्‍या वतीने त्‍यांचा मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला. याप्रसंगी संस्‍थानच्‍या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे व कर्मचारी उपस्थित होते.

Recent News