Languages

  Download App

News

News

श्री साईबाबांचे दर्शनासाठी देश  विदेशातून मोठया प्रमाणात भाविक येत असतात. त्‍यामध्‍ये  दक्षिण भारतातील भाविकांची संख्या मोठी असल्‍यामुळे त्यांना सेवा-सुविधा पुरविणेकामी मार्गदर्शन करतांना  बऱ्याच वेळा भाषेचा अडसर येत असतो . अशा भाविकांशी मातृ भाषेतून संवाद झाला तर भक्तांना आपुलकी वाटेल या हेतूने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा. प्र.से) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम हुलवळे यांच्या सुचनेनुसार सर्व संस्थान कर्मचारी यांना तेलगू भाषेचे प्राथमिक ज्ञान व्हावे याकरिता प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले त्याची सुरुवात आज दि.१८ जून २०२४ पासून संरक्षण विभागातील प्रातिनिधीक काही कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाली. 
याप्रसंगी श्री साईबाबा संस्‍थानच्या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, प्र.अधिक्षक प्रविण मिरजकर आदी उपस्थित होते.

Recent News