माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची कन्या नवनर्वाचित आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण उपस्थित होत्या. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा सत्कार केला.