मा.ना.श्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री, आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटूंब कल्याण, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.