Languages

   Download App

News

News

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्‍या दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजीच्‍या कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजीपासून रात्रौ ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत जमावबंदी लागु केल्‍यामुळे चालू वर्षाला

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्‍या दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजीच्‍या कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजीपासून रात्रौ ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत जमावबंदी लागु केल्‍यामुळे चालू वर्षाला

December 28th, 2021

शिर्डी - 

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्‍या दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजीच्‍या कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजीपासून रात्रौ ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत जमावबंदी लागु केल्‍यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्रौ ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोंबर २०२१ पासून काही अटी-शर्तीवर धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले होते. त्‍यानुसार श्री साईबाबांचे मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले होते. परंतु सध्या देशात व राज्‍यात कोरोना विषाणुचा ओमायक्रॉन या व्‍हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता पुन्हा राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्‍या आहेत. त्‍यानुसार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी पासुन रात्रौ ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत जमावबंदी लागु केलेली आहे. त्‍याअनुषंगाने संस्‍थानच्‍या वतीने रात्रौ ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शन व आरतीसाठी भाविकांना बंद ठेवण्‍यात येणार असल्‍यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्रौ ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

तसेच राज्‍य शासनाचा पुढील आदेश प्राप्‍त होईपर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिरातील रात्रौ १०.३० वाजताची श्रींची शेजारती व पहाटेची ०४.३० वाजताची काकड आरती नियमित होणार असून याकरीता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. याबरोबरच श्रींच्‍या दर्शनाकरीता सकाळी ०६.०० ते रात्रौ ०९.०० यावेळेत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, याची सर्व भाविकांनी नोंद घ्‍यावी. तरी भाविकांनी कोव्‍हीड १९ चे संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन श्रींच्‍या दर्शनाचा लाभ घ्‍यावा. तसेच सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.

Recent News

Donation