Languages

   Download App

News

News

शिर्डी – राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघातील खेळाडू फिजा सय्यद यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्यांचा सत्कार केला.
फिजा सय्यद या सोळाव्या वरिष्ठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या अकोले, जि. अहिल्यानगर येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या उल्लेखनीय खेळाने संघाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Recent News