Languages

  Download App

News

News

शिर्डी:-

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी,  नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या  संयुक्‍त विद्यमाने सोमवार दिनांक ०५ ऑगस्‍ट, २०२४ ते सोमवार दिनांक १२ ऑगस्‍ट २०२४ या कालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास येथील शताब्‍दी मंडपात आयोजित करण्‍यात आलेल्‍या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. 

श्रावणमासा निमित्त दरवर्षी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा हजारो पारायण वाचकांच्‍या उपस्थितीत साजरा करण्‍यात येणार आहे. या पारायण सोहळ्याचे हे ३० वे वर्ष आहे. त्‍यानुसार सोमवार दिनांक ०५ ऑगस्‍ट, २०२४ ते सोमवार दिनांक १२ ऑगस्‍ट २०२४ या कालावधीत नगर-मनमाड रोड लगत असलेले साईआश्रम येथील शताब्‍दी मंडपात श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत (पुरुष वाचक) व दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत (महिला वाचक) यांचे श्री साईसच्‍चरित पारायण वाचन होईल.

प्रथम दिवशी दिनांक ०५ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरातून पोथी व फोटोची पारायण मंडपापर्यंत मिरवणूक, ग्रंथ व कलश पूजन होवून पारायणास सुरुवात होईल. या पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, सर्व सांस्‍कृतिक कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत अनहद ग्रुप, नाशिक यांचा संगीतमय भक्‍तीसंगीत कार्यक्रम, सायंकाळी ०५.३० ते ०६.३० यावेळेत श्री. ज्ञानदेव आबा गोंदकर यांचा समाधीनंतर श्री साईबाबांचे साक्षात्‍कार या विषयावर प्रवचण, रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. सौ. सुजाताताई पा. कदम चाळाखेकर, नांदेड यांचा किर्तनाचा कार्यक्रम होईल. दिनांक०६ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदीर, शिर्डी यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम, सायं.०५.३० ते ६.३० यावेळेत सौ. आशाबाई भानुदास गोंदकर, शिर्डी यांचा प्रवचण कार्यक्रम व सायं.७.३० ते रात्रौ ९.३० या वेळेत नाट्य रसिक मंच यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम होईल. दिनांक ०७ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्रद्धा सबुरी सत्‍संग परिवार, कटक, ओरीसा यांचा साईभजन कार्यक्रम, सायं.०५.३० ते ०६.३० यावेळेत डॉ. विलास सोमवंशी, पुणे यांचे अध्‍यात्‍म, नियती आणि कर्माचे नियम या विषयावर प्रवचण व सायं.०७.३० ते रात्रौ.०९.३० यावेळेत जगदिश पाटील, ठाणे यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होईल. दिनांक ०८ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०२.०० ते ०४.०० यावेळेत द्वारका साई सेवा सोसायटी, जालंदर, पंजाब यांचा साईभजन कार्यक्रम, सायं.०४.०० ते ०६.०० या वेळेत श्री अरविंद महाराज, शिर्डी यांचा संगीतमय साईकथा कार्यक्रम व सायं.०७.३० ते रात्रौ.०९.३० यावेळेत श्री विजय घाटे, मुंबई यांचा ताल दिंडी कार्यक्रम होईल. दिनांक०९ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री अरविंद महाराज, शिर्डी यांचा संगीतमय साईकथा कार्यक्रम, सायं.०५.३० ते ६.३० यावेळेत श्री गोरक्ष नलगे, राहुरी यांचा साईकथा कार्यक्रम, सायं. ५.३० वाजता पारायणार्थी महिला मंडळ, शिर्डी यांचा हळदी कुंकु समारंभ कार्यक्रम व सायं.७.३० ते रात्रौ ९.३० या वेळेत श्री साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श प्राथमिक विद्यामंदीर शिर्डी-विद्यार्थ्‍यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम पारायण मंडप येथे होईल तसेच याच दिवशी सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत आर. डी. म्‍युझीक अकॅडमी, श्रीरामपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम  गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप येथे होईल. दिनांक १० ऑगस्‍ट रोजी दुपारी ०२.०० ते ०४.०० यावेळेत श्री अरविंद महाराज, शिर्डी यांचा संगीतमय साईकथा कार्यक्रम, सायं.४.०० ते ६.०० यावेळेत पंचमवेदा नाट्य निलायम, हैद्राबाद यांचा कुचिपुडी डान्‍स कार्यक्रम व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री राजेश खर्डे, वेसावकर यांचा परंपरा साईंची कार्यक्रम होईल. दिनांक ११ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री अरविंद महाराज, शिर्डी यांचा संगीतमय साईकथा कार्यक्रम, सायं.५.३० ते ६.३० यावेळेत श्री ज्ञानेश्‍वर महाराज मंदीर, निमगाव (परमहंस काशिकानंद महाराज) यांचा हरिपाठ कार्यक्रम, व सायं.०७.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत सौ. विजया साखरकर, बोरिवली यांचा साईस्‍वर नृत्‍योत्‍सव कार्यक्रम होईल. दिनांक १२ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री अरविंद महाराज, शिर्डी यांचा संगीतमय साईकथा कार्यक्रम, सायं.५.३० ते ६.३० यावेळेत डॉ. नचिकेत वर्पे, शिर्डी यांचा योग व आहार या विषयावर व्‍याख्‍यान व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत बालकिर्तनकार ह.भ.प. कृष्‍णा हजारे, शिर्डी यांचा किर्तनाचा कार्यक्रम होईल. 

तर सोमवार दिनांक १२ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०७.०० ते ०८.३० यावेळेत पुरुष वाचक व सकाळी ०९.०० वाजता महिला वाचक अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती होणार आहे. दुपारी ३.३० वाजता गावातुन श्री साईसच्‍चरीत्र ग्रंथ (पोथी) मिरवणुक होईल. पारायण समाप्‍तीच्‍या मिरवणुकीमध्‍ये पारंपारीक संबळ वाद्यांचे १०-१२ पथके, श्री देव कुडाळेश्‍वर मित्र मंडळ, कुडाळ यांचे ३ धार्मिक देखाव्‍यांचे चित्ररथ व विषेश आकर्षण रंजीनी आर्टस, मालाप्‍पुरा, केरळ यांचे पारंपारिक वाद्य व दाक्षिणात्‍य नृत्‍यासह विविध सोंगे असणार आहेत. मिरवणूक परत आल्‍यानंतर वीणा पूजन होईल. तर मंगळवार दिनांक १३ ऑगस्‍ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत पारायण मंडपात ह.भ.प. श्री. गंगाधर बुवा व्‍यास यांचे काल्‍याचे कीर्तन व त्‍यानंतर दुपारी १२.३० ते ०३.०० यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. 

पारायण मंडपात सकाळी ७.०० ते ११.३० यावेळेत पारायणाच्‍या वेळी फक्‍त पुरुषच पारायण करतील व दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत फक्‍त महिलाच पारायण करतील. पारायणासाठी वाचकांनी ग्रंथ, श्रीफळ आणि बस्कर स्वत: आणावयाचे असून शालेय विद्यार्थी व १८ वर्षाच्या आतील वाचकांना प्रवेश दिला जाणार नाही. याबरोबरच ०२ तास अखंड विणा सेवेसाठी इच्छुकांनी आपली नावे नोंदणी कार्यालयात नोंदवावीत. या पारायण सोहळ्यात जास्तीत जास्त साईभक्‍त व ग्रामस्‍थांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन यावेळी केले आहे. 

हा पारायण सोहळा यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी श्री.सिध्‍दाराम सालीमठ व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, नाटय रसिक मंचाचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्‍थ व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

Recent News