श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या वतीने, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष व भारतातील उद्योगजगताचे महानायक, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारतीय उद्योगसृष्टीत अभूतपूर्व योगदान दिले आणि समाजसेवेच्या कार्यामध्ये टाटा समूहाचे असामान्य स्थान निर्माण केले.
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक वर्षांपासून श्री साईबाबा संस्थानला विविध प्रकल्पांद्वारे मोलाचे सहकार्य केले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने संस्थानच्या देणगी आणि जनसंपर्क कार्यालयासाठी तसेच संस्थानच्या विविध ऑनलाईन सेवांसाठी सन २०१८ पासून मोफत सॉफ्टवेअर सेवा दिली असून सॉफ्टवेअरच्या देखरेखीसाठी आवश्यक मनुष्यबळही नियमितपणे उपलब्ध करून दिले आहे.
कोविड-19 महामारीच्या संकट काळात, टाटा समुहाच्या टाटा सन्सकडून संस्थानच्या रुग्णालयासाठी सुमारे १.३७ कोटी रुपयांचे PPE किट्स आणि वैद्यकीय साहित्य देणगी स्वरूपात प्राप्त झाले होते.
रतन टाटा यांच्या दूरदर्शी आणि दातृत्वपूर्ण नेतृत्वामुळे टाटा समूहाने समाजकल्याणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांचे कार्य नेहमी प्रेरणादायी राहील.