Languages

  Download App

News

News

आज शुक्रवार दि.०४ ऑक्‍टोबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्‍थानचे नवीन शैक्षणिक संकुलात संस्‍थानच्‍या ज्‍यु.के.जी. ते इयत्‍ता १० पर्यंतचे इंग्रजी व मराठी माध्‍यमांचे  वर्ग सुरु करणेत आले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से.यांनी विद्यार्थ्‍यांचे गुलाब पुष्‍प देवून स्‍वागत केले. यावेळी इंग्‍लीश मिडीयम स्कूलचे माध्‍यमिक विभागाचे प्राचार्य तांबोळी सर, प्राथमिक विभागाच्‍या मुख्याध्यापिका पुजारी मॅडम,  कन्‍या विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य वरघुडे सर, वरिष्ठ महाविद्यालयचे प्रचार्य औताडे सर, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ, बांधकाम विभागाचे कनिष्‍ठ अभियंता गणेश कोराटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Recent News