Languages

  Download App

News

News

पंढरपूर येथील ७६ वर्षीय देणगीदार साईभक्त तात्यासाहेब गुंड पाटील यांनी आज आपल्या कुटुंबातील सदस्यांसह श्री  साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.
तात्यासाहेब गुंड पाटील हे पंढरपुर येथील रहिवासी असून तिथे त्यांचे कापड दुकान आहे. ते १९९७ पासून रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या आपल्या कापड दुकानातील व्यवसायातील उत्पन्न हे  साईबाबांच्या चरणी देणगी स्वरूपात अर्पण करतात. ही परंपरा त्यांनी गेल्या २७ वर्षापासुन अखंडितपणे जपली आहे. आज दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर यांनी सत्कार केला यावेळी संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. 
या वेळी साईभक्त गुंड पाटील यांनी आपल्या आयुष्यात साईबाबांच्या कृपेने प्रगती झाली असल्याचे सांगून विविध अनुभव सांगितले.

Recent News