"श्री साईबाबा संस्थानमार्फत यूट्यूबर व सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संमेलन आयोजित - अर्ज मागविणे सुरू"
श्री साईबाबांच्या जीवनकार्याचा तसेच श्री साईबाबा संस्थानमार्फत सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांचा प्रचार आणि प्रसार डिजिटल माध्यमांतून अधिक प्रभावी व्हावा, या हेतूने लवकरच "सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व यूट्यूबर संमेलन" श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येत असून, यासाठी इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली.
या उपक्रमाबाबत माहिती देताना श्री गाडिलकर म्हणाले की, "अलीकडील काळात सोशल मीडिया हे प्रभावी संवादाचे आणि प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. शिर्डी संस्थानच्या सेवा कार्याचा व्यापक प्रचार व्हावा, या दृष्टिकोनातून मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री साई सोशल मिडीया संमेलन आयोजित करण्याची सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व यूट्यूबर साईभक्तांची मागणी होत होती. सदर प्रस्तावाला माननीय तदर्थ समितीची मान्यता मिळालेली असून, त्यानुसार हे संमेलन लवकरच पार पडणार आहे."
या संमेलनात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १५ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर www.sai.org.in तसेच जनसंपर्क विभागामध्ये उपलब्ध आहे.
पात्रताः
> अर्जदार हा सोशल मीडियावर सक्रिय असावा (YouTube, Instagram, Facebook, इ.) किमान २५,००० फॉलोअर्स / सबस्क्राइबर्स असणे आवश्यक.
> आध्यात्मिक, समाजोपयोगी, प्रेरणादायी आशयावर आधारित व्हिडिओ तयार करण्याचा अनुभव असावा.
> यापूर्वी कोणतीही वादग्रस्त पोस्ट केलेली नसावी.
संमेलनासाठी पात्र अर्जाची तपासणी करून निवड झालेल्या इन्फ्लुएंसर्सना संमेलनाचे ठिकाण, तारीख आणि वेळ संस्थानमार्फत स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. निवड झालेल्या व्यक्तींकरिता संस्थानमार्फत भक्तनिवासात निवास, तसेच प्रसादालयात भोजन व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे. शिर्डी संस्थानच्या या नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रमात सहभागी होण्यासाठी YouTubers, Instagram Reel Creators, Facebook Video Creators, तसेच अन्य प्रभावशाली डिजिटल कंटेंट निर्मात्यांनी आपला अर्ज १५ डिसेंबर २०२६ पूर्वी सादर करावा, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
“Shree Saibaba Sansthan to Organise YouTubers and Social Media Influencers’ Conclave – Applications Invited”
With the objective of promoting and disseminating the life and teachings of Shree Saibaba, as well as the various welfare and service activities undertaken by Shri Saibaba Sansthan, through digital media in a more effective manner, Shree Saibaba Sansthan will soon be organising the “Social Media Influencers and YouTubers’ Conclave”. Applications are being invited from interested individuals for participation in this conclave, informed Shri Goraksh Gadilkar, Chief Executive Officer of Shree Saibaba Sansthan.
While sharing information about this initiative, Shri Gadilkar stated that, “In recent times, social media has emerged as an important and effective medium of communication and publicity. With a view to ensuring wider publicity of the various service activities undertaken by Shirdi Sansthan, social media influencers and YouTuber devotees of Shree Saibaba had expressed their desire to organise the Shree Sai Social Media Conclave this year as well, following the successful organisation of the event last year. The said proposal has received approval from the Hon’ble Ad Hoc Committee, and accordingly, the conclave will be organised shortly.”
Interested individuals wishing to participate in the conclave are required to submit their applications on or before 15th December 2026. The application form is available on the official website of the Sansthan at www.sai.org.in and also at the Public Relations Department of the Sansthan.
Eligibility Criteria:
Ø The applicant must be active on social media platforms such as YouTube, Instagram, Facebook, etc., with a minimum of 25,000 followers/subscribers.
Ø The applicant must have experience in creating videos based on spiritual, socially beneficial and inspirational content.
Ø The applicant should not have published any controversial posts in the past.
After scrutiny of the applications, the selected influencers will be informed separately by the Sansthan about the venue, date and time of the conclave.
For the selected participants, the Sansthan will provide complimentary accommodation at the Bhakta Niwas and free meals at the Prasadalaya.
Shree Saibaba Sansthan appeals to YouTubers, Instagram Reel Creators, Facebook Video Creators and other influential digital content creators to participate in this innovative digital initiative of Shirdi Sansthan by submitting their applications on or before 15th December 2026.



