प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा श्रद्धा आणि भक्तीवर दृढ विश्वास असून, प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ते श्री साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीला भेट देत असतात.
या वेळी त्यांनी त्यांच्या आगामी "कनप्पा" या चित्रपटाच्या यशासाठी श्री साईंच्या चरणी प्रार्थना केली.
त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांनी त्यांचा शाल व साईंची मूर्ती देऊन सत्कार केला ,यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. यावेळी मोहन बाबू यांनी श्री साईबाबा संस्थानच्या नवीन उपक्रमांची माहिती जाणून घेत येथील स्वच्छतेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी श्री साईबाबांच्या कृपेने त्यांचा हा चित्रपट यशस्वी आणि सर्वांच्या मनात स्थान मिळवणारा ठरो, अशी भावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी व्यक्त केली.