Languages

  Download App

News

News

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पाथरे बुद्रुक येथे नुकत्याच आयोजित राहाता तालुकास्तरीय गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनात श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्राथमिक विभागातील चि. चैतन्य सुयोग वाणी याने इयत्ता १ली ते ५वी गटातील विज्ञान गटात द्वितीय क्रमांक पटकावला, तर चि. अर्थव मच्छिंद्र खैरनार याने इयत्ता ६वी ते ८वी गटातील विज्ञान गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना श्रीमती चारुशिला घाडगे आणि श्री अमोल निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले.
राहाता तालुक्यातील जवळपास १०५ शाळांनी सहभाग घेतलेल्या या प्रदर्शनात एकूण २६२ उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले होते. प्रदर्शनाचा समारोप तिसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळ्याने झाला. प्रमुख पाहुणे सौ. धनश्रीताई सुजय विखे पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. या वेळी राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री राजेश पावसे व इतर मान्यवर उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे, चि. अर्थव मच्छिंद्र खैरनार याची जिल्हास्तरीय गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्‍कूल, शिर्डीचे या यशाबद्दल मा.तदर्थ समितीच्‍या अध्‍यक्षा मा.श्रीमती.अंजू शेंडे (सोनटक्‍के) प्रधान जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश, अहिल्‍यानगर मा.श्री.सिध्‍दाराम सालीमठ, (भा.प्र.से) जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य, तदर्थ समिती तसेच, मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी, श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से), उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी, श्री संदिपकुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी, श्रीमती.प्रज्ञा महांडुळे-सिनारे, श्री विश्‍वनाथ बजाज, व लेखाधिकारी श्री अविनाश कुलकर्णी तसेच, शाळेचे प्राचार्य, श्री आसिफ तांबोळी (माध्‍यमिक विभाग) व मुख्‍याध्‍यापिका (प्राथमिक विभाग) सौ.शिल्‍पा पुजारी, यांनी गुणवंत विदयार्थ्‍यांचे अभिनंदन केले.

Recent News