शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते दिनांक ०२ जानेवारी २०२६ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत सुमारे २३.२९ कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दिली.
श्री. गाडीलकर म्हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते दिनांक ०२ जानेवारी २०२६ याकाळात दानपेटीतून ६ कोटी ०२ लाख ६१ हजार ००६ रुपये, देणगी काउंटर व्दारे ३ कोटी २२ लाख ४३ हजार ३८८ रुपये, पी.आर.ओ. सशुल्क पासद्वारे २ कोटी ४२ लाख ६० हजार रूपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी व मनी ऑर्डद्वारे १० कोटी १८ लाख ८६ हजार ९५५ रुपये तर, विविध २६ देशांचे परकिय चलनाद्वारे १६ लाख ८३ हजार ६७३ रुपये अशी एकुण २२ कोटी ०३ लाख ३५ हजार ०२२ रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच सोने (२९३.९१० ग्रॅम) ३६ लाख ३८ हजार ६१० रुपये व चांदी (०५ किलो ९८३ ग्रॅम), ९ लाख ४९ हजार ७४१ रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. तसेच नविन वर्षाचे पहिल्या दिवशी श्री साईबाबांच्या चरणी ६५५ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षिकाम असलेला सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण केला. सदर मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे ८० लाख रुपये असून त्यामध्ये अंदाजे ५८५ ग्रॅम शुद्ध सोने व सुमारे १५३ कॅरेटचे मौल्यवान हिरे आहेत. अशा प्रकारे विविध माध्यमातुन अंदाजे एकुण २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.
तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात ०६ लाखाहुन अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख ०९ हजाराहुन अधिक साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ७ लाख ६७ हजार ४४४ लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्यात आली असून याव्दारे ०२ कोटी ३० लाख २३ हजार ३२० रुपये प्राप्त झालेले आहे. याबरोबरच ५ लाख ७६ हजार ४०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधाकरीता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्यात येत असल्याचे ही श्री. गाडीलकर यांनी सांगितले.
SHIRDI: On the occasion of the Christmas holidays and the New Year celebrations, the Shri Saibaba Sansthan Trust (Shirdi) organized the 'Shirdi Festival' from December 25, 2025, to January 2, 2026. Goraksha Gadilkar (IAS), Chief Executive Officer of the Sansthan, reported that over 8 lakh devotees visited the shrine, contributing a total donation of approximately ₹23.29 crore.
Financial Breakdown of Donations: The total cash collection reached ₹22.03 crore through various channels:
-
Donation Boxes (Dakshina): ₹6.02 Crore
-
Donation Counters: ₹3.22 Crore
-
Paid Passes (P.R.O.): ₹2.42 Crore
-
Online/Digital Payments (Debit/Credit, Check/DD): ₹10.18 Crore
-
Foreign Currency (from 26 countries): ₹16.83 Lakh
Gold and Silver Offerings: In addition to cash, the Sansthan received 293.91 grams of gold (worth ₹36.38 lakh) and 5.98 kg of silver (worth ₹9.49 lakh). A highlight of the New Year was a gold and diamond-studded crown weighing 655 grams, valued at approximately ₹80 lakh, offered at the feet of Saibaba.
Devotee Services and Prasadalaya:
-
Free Meals: Over 6 lakh devotees received free meals at the Shri Sai Prasadalaya.
-
Food Packets: Over 1.09 lakh devotees utilized the food packet service.
-
Ladoo Prasad: 7.67 lakh packets were sold, generating ₹2.30 crore.
-
Free Boondi Prasad: 5.76 lakh packets were distributed.
CEO Gadilkar emphasized that these funds are utilized for the Shri Saibaba and Shri Sainath Hospitals, educational institutions, charitable medical aid for outpatients, and enhancing infrastructure and social welfare projects for devotees.
शिर्डी: क्रिसमस की छुट्टियों और नववर्ष के स्वागत के उपलक्ष्य में आयोजित 'शिर्डी महोत्सव' (25 दिसंबर 2025 से 2 जनवरी 2026) के दौरान 8 लाख से अधिक साईं भक्तों ने समाधि के दर्शन किए। संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (IAS) ने जानकारी दी कि इस नौ दिवसीय अवधि में संस्थान को कुल ₹23.29 करोड़ का दान प्राप्त हुआ है।
दान का विवरण: नकद और डिजिटल माध्यमों से कुल ₹22.03 करोड़ जमा हुए:
-
दान पेटी: ₹6.02 करोड़
-
दान काउंटर: ₹3.22 करोड़
-
सशुल्क पास (PRO): ₹2.42 करोड़
-
ऑनलाइन, चेक और कार्ड: ₹10.18 करोड़
-
विदेशी मुद्रा (26 देश): ₹16.83 लाख
स्वर्ण और आभूषण: भक्तों ने 293.91 ग्राम सोना और लगभग 6 किलो चांदी अर्पित की। नए साल के पहले दिन बाबा के चरणों में 80 लाख रुपये मूल्य का स्वर्ण-हीरा जड़ित मुकुट अर्पित किया गया। इस मुकुट में 585 ग्राम शुद्ध सोना और 153 कैरेट के कीमती हीरे जड़े हैं।
भक्त सेवा और प्रसाद वितरण:
-
नि:शुल्क भोजन: श्री साईं प्रसादालय में 6 लाख से अधिक भक्तों ने भोजन ग्रहण किया।
-
लड्डू प्रसाद: ₹2.30 करोड़ मूल्य के 7.67 लाख लड्डू पैकेटों की बिक्री हुई।
-
नि:शुल्क बूंदी प्रसाद: 5.76 लाख भक्तों को वितरित किया गया।
सीईओ गाडीलकर ने स्पष्ट किया कि प्राप्त दान का उपयोग संस्थान द्वारा संचालित अस्पतालों, शैक्षणिक संस्थानों, गरीब मरीजों की सहायता और सामाजिक जनकल्याणकारी कार्यों के लिए किया जाता है।

