Languages

  Download App

साईबाबा संस्थानचे नवीन देणगी कार्यालय सुरू

साईबाबा संस्थानचे नवीन देणगी कार्यालय सुरू

दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने प्रवेशद्वार क्र. १ येथे नवीन देणगी कार्यालयाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु एस. शेंडे (सोनटक्के) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्वनाथ बजाज, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख अनिल शिंदे, फायर विभागाचे विभागप्रमुख प्रताप कोते, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील गायकवाड, साईप्रसाद निवास्‍थान विभागप्रमुख प्रविण मिरजकर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी, देणगी कार्यालयाचे काम पुर्ण करणारे कंत्राटदार महेश डांगे यांचा श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु एस. शेंडे (सोनटक्के) यांनी सत्‍कार केला. तर, कोलकाता येथील देणगीदार साईभक्त प्रबल प्रमाणिक यांनी रुपये १ लाखाचे धनादेशाद्वारे देणगी केली. त्याबद्दल, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.

Undefined
साईबाबा संस्थानचे नवीन देणगी कार्यालय सुरू
Thursday, January 16, 2025 - 18:30