श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी आंध्रप्रदेश योथिल एका श्री साईभक्ताने श्री साईचरणी ९५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्नांचे खडे असलेला सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द केला. याची किंमत ०१ कोटी ०२ लाख ७४ हजार ५८० रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार श्री साईभक्त यांचा सत्कार केला. श्री साईभक्त यांच्या विनंतीवरून त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.