मे.जेम इन्हायरो मॅनेजमेंट प्रा.लि.दिल्ली यांनी संस्थान परिसरातील प्लास्टीक कचरा मुक्त करणेसाठी प्रत्येकी ६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५ नग पेट बॉटल रिव्हर्स मशिन्स देणगी स्वरुपात दिले. या मशिनचे उदघाटन करताना खासदार दिलीप गांधी व संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, मे.जेम इन्हायरो मॅनेजमेंट प्रा.लि.दिल्ली च्या उपाध्यक्षा श्रीमती निलिमा व्दिवेदी, डायरेक्टर सचिन शर्मा, संस्थानचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील आदी उपस्थित होते.